अभिनेता रणवीर सिंग हा कायमच त्याच्या चित्र-विचित्र कपड्यांमुळे चर्चेत असतो. पण आता रणवीर सिंग हा न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आला आहे
त्याच्या या फोटोशूटने सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. त्यानंतर त्याच्यावर अनेकांनी टीका केली
त्यानंतर न्यूड फोटोशूटमुळे समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रमुख अबू आझमी यांनी ट्विट करून रणवीर सिंगच्या या फोटोशूटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते
याशिवाय रणवीर सिंगच्या न्यूड फोटोंवर एकामागून एक सेलिब्रिटींच्या प्रतिक्रियाही येत होत्या. ज्यात अर्जुन कपूर, दीपिका पदुकोण आणि पूनम पांडे यांनी आपल्या प्रतिक्रीया दिल्या होत्या
सेलिब्रिटींच्या प्रतिक्रियांनंतर आलिया भट्टही यावर बोलली होती. मात्र आता याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले
भारतीय संस्कृतीला धक्का पोहोचवने तसेच 'महिलांच्या भावना दुखावल्याचा' आरोप या सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे आता रणवीरच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण केली जात आहे.
अभिनेता रणवीर सिंगने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर नग्न छायाचित्रे पोस्ट केल्याप्रकरणी मुंबईतील चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी अद्याप एफआयआर नोंदवलेली नाही