उर्फीच्या बोल्डनेसवर वकिलाची तक्रार दाखल

इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेद तिच्या असामान्य पोशाखांमुळे चर्चेत राहते

ती फॅशन सेन्सच्या नावाखाली काय घालेल किंवा कशाचा वापर करेल हे सांगता येत नाही

मात्र आता तिची हीच बोल्ड फॅशन तिला अडचण ठरण्याची चिन्ह दिसत आहे

उर्फीविरोधात अली काशिफ खान देशमुख या वकिलाने तक्रार दाखल केल्याने तिला अडचणीचा सामना करावा लागू शकतो

उर्फीविरुद्ध मुंबईच्या अंधेरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे

वकिलाने उर्फीवर सार्वजनिक ठिकाणी आणि सोशल मीडियावर कथितपणे अश्लीलता पसरवल्याचा आरोप केला

उर्फीवर 'हे है ये मजबूरी' या गाण्यात खूप बोल्ड आणि रिव्हिलिंग आउटफिट्स घातल्यावरून तक्रार दाखल करण्यात आली होती

तर प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनीही उर्फीवर तरुणांना भडकावल्याचा आरोप केला आहे