अभिषेकचा 49 वा वाढदिवस; सांगितला बर्थडे प्लॅन, म्हणाला "ऐश्वर्यासोबत...."

5 February 2025

Created By : मयुरी सर्जेराव

गेल्या काही महिन्यांपासून बच्चन कुटुंबात सर्व काही ठीक नसल्याच्या बातम्या येत होत्या.

ऐश्वर्या आणि अभिषेकमध्ये मतभेद सुरू असल्याच्या चर्चा होत्या. 

मात्र जेव्हा बच्चन कुटुंब आराध्याच्या शाळेतील कार्यक्रमात एकत्र दिसले तेव्हा चर्चांना पूर्णविराम मिळाला

दरम्यान आज अभिषेकचा 5 फेब्रुवारी रोजी 49 वा वाढदिवस आहे

अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत अभिषेकनं त्याचा बर्थडे प्लान शेअर केला होता

माध्यमांशी बोलताना, अभिषेक म्हणाला होता "मी दरवर्षी माझ्या वाढदिवसादिवशी काम करतो"

"मी हे का करतो हे मला माहित नाही, पण मी करतो. मला ते खूप आरामदायक वाटतं. शिवाय, शूटिंग संपताच मी घरी जातो."

"मी माझ्या आईवडिलांसोबत आणि पत्नी ऐश्वर्यासोबत वेळ घालवतो. जर मी हे सर्व केलं नाही तर माझा वाढदिवस माझ्यासाठी चांगला राहणार नाही"

"मी माझ्या आईवडिलांच्या खूप जवळ आहे. त्या दोघांशी माझं घट्ट नातं आहे. मी त्यांच्याशीअनेक गोष्टींबद्दल बोलतो"