मराठी अभिनेत्याची स्वप्नपूर्ती ! 30 व्या वाढदिवशी घेतली नवी कार... नावही  हटके !

29 October 2024

Created By : Manasi Mande

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सुनील तावडे यांचा मुलगा शुभंकरही अभिनेता आहे. (Photos :Instagram)

शुभंकरने फ्रेशर्स मालिकेतून पदार्पण केलं, त्यानंतर तो कागर, कन्नी सारख्या प्रोजेक्ट्समधून दिसला.

शुभंकरने नुकताच 30 वाढदिवस साजरा केला. त्याच निमित्ताने त्याने स्वप्नपूर्ती करत एक गुड न्यूजही शेअर केली.

वाढदिवसानिमित्त शुभंकरने नवी कार विकत घेतली. त्याचे फोटोही त्याने सोशल मीडियावर शेअर केलेत.

 तावडे कुटुंबाने या नव्या कारचं नाव 'लक्ष्मी' असं ठेवलंय, पण शुभंकर सिक्रेटली या कारला 'फ़नकार' म्हणतो.

गाडी घेतल्यावर शुभंकरने खास पोस्ट शेअर केली असून त्यात त्याचं संपूर्ण कुटुंबही सोबत दिसतंय.

तसेच त्याच्या नव्या नाटकाची म्हणजेच ‘विषामृत’ची देखील घोषणा झाली.

शुभंकरच्या पोस्टवर चाहत्यांनी आणि इतर कलाकारांनी लाईक्सचा वर्षाव करत शुभेच्छा दिल्या.