तुझे कपडे उतरव... अभिनेत्रीकडे खुलेआम मागणी, धक्कादायक अनुभव शेअर करत म्हणाली...
11 March 2025
Created By : Manasi Mande
ग्रेट ग्रँड मस्ती, राम रतन सारख्या चित्रपटात दिसलेली कंगना शर्माला कास्टिंग काऊचचा कटू अनुभव आला. एका कास्टिंग डायरेक्टरने खुलेआम तिच्याकडे भयानक मागणी केली. (photos :Instagram)
पारस छाब्राच्या पॉडकास्टमध्ये कंगनाने अनुभव शेअर केला. एका व्यक्तीने खुलेआम तिच्याकडे अंडरगारमेंट काढण्याची मागणी केली होती. त्यामुळे ती प्रचंड भडकली.
एका एजन्सीच्या मालकाने मला भेटायला बोलावलं. त्याने विचारलं, तुला माहीत आहे ना हे किती बोल्ड काम आहे ? मी म्हटलं हो, त्यात लव्ह मेकिंग सीन आहेत, मला कल्पना आहे.
ओरल सीन करशील का ? असा सवाल त्याने विचारला. मी हो म्हणाले. त्यानंतर त्या इसमाने कंगनाला काही क्रेझी करायला सांगितलं. ते ऐकून ती आश्चर्यचकित झाली. इथे कसं करू ? असा सवाल तिने विचारला.
कंगनाने तेव्हा एका फ्रॉक घातला होता. तेव्हा तो माणूस म्हणाला, तू मला तुझी अंडरवेअर काढून दे, अशी मागणी त्याने केली.
ते ऐकून कंगनाला शॉक बसला. ही काय पद्धत आहे ? इतक्या लोकांसमोर असं कसं बोलू शकतोस ? असा सवाल विचारत तिने त्याला फटकारलं.
तू इथे थप्पड खाशील की बाहेर जाऊन मारू ? असा सवाल तिने विचारला. त्यावर तो म्हणाला - मी फक्त तुझा बोल्डनेस चेक करत होतो.
ते ऐकून कंगना आणखी भडकली. माझे कपडे उतरवायला लावून तू बोल्डनेस चेक करणार का ? मी प्रचंड भडकले आणि त्याला निघून जायला सांगितलं.
मात्र ते ऐकून त्या कास्टिंग डिरेक्टरची भीतीने गाळण उडाली. हे कोणालाही सांगू नकोस, अशी विनंतीही त्याने कंगनाला केली.