सिद्धार्थच्या वाढदिवशी शहनाज भावूक, फोटो शेअर करत म्हणाली...

प्रसिद्ध टेलिव्हिजन आणि बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आज आपल्यात नाही. त्याचे 2 सप्टेंबर 2021 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले

पण त्याच्या आठवणी आजही चाहत्यांच्या हृदयात जिवंत आहेत

आज12 डिसेंबर हा त्याचा वाढदिवस. या निमित्ताने त्याचे आणि शहनाज गिलचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत

सिद्धार्थच्या वाढदिवसावर शहनाजने वेगळ्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत

शहनाजने दिवंगत सिद्धार्थचे स्मरण करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच तिने अनेक फोटो शेअर केले आहेत

शहनाजने येथे दोन केकचे फोटो शेअर केले आहेत. यापैकी एकावर सिड लिहिले आहे आणि दुसऱ्यावर 12.12 लिहिले आहे

सर्वात सुंदर आणि रोमँटिक फोटो शेअर केला आहेत. ज्यात दोन हात दिसत आहेत, त्यापैकी एक शहनाजचा आणि दुसरा सिद्धार्थ शुक्लाचा आहे

तसेच शहनाजने फोटोसोबत कॅप्शन लिहलं, 'मी तुला पुन्हा भेटेन...12.12'