दुसऱ्या धर्मात लग्न करताच अभिनेत्री प्रचंड ट्रोल, लव जिहाद ते ... अभिनेत्रीची वेदना काय?
21 September 2024
Created By : Manasi Mande
शिबानी दांडेकर प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तत्पूर्वी तिने मॉडेलिंगच्या दुनियेतही नाव कमावलं. (Photos : Instagram)
अभिनेता-दिग्दर्शक फरहान अख्तरशी लग्न झाल्यावर शिवानी खूप चर्चेत आली. एक पॉडकास्टमध्ये तिने अनेक गोष्टींचा खुलासा केला.
मी फरहानला डेट करण्यास सुरूवात केली तेव्हा लोकांनी मला गोल्ड डिगर म्हटलं.
त्याच्याशी लग्न करण्यापूर्वी मला कोणीच ओळखत नव्हतं, अशी टीकाही झाली.
सोशल मीडियावरच्या अनेक गोष्टींचा त्रास व्हायला लागतो. तेच खरं मानलं तर त्या गोष्टींचा तुमच्यावर परिणाम होतो.
फरहानसोबत रिलेशनमध्ये आल्यावर अनेकांनी मला गोल्ड डिगर म्हटलं, कोणी लव्ह जिहादचा अँगल दिला.
पण ते ऐकून रडत बसणाऱ्यांपैकी मी नाही. तो मुस्लिम कुटुंबातील आहे आणि मी हिंदू कुटुंबातून हे खरं आहे. आम्ही लग्न केलंय आणि एकमेकांसोबत खुश आहोत.
फरहानमुळे ही फेमस झाली, अशा अनेक कमेंट्स मी वाचते. त्या वाचून मी काय स्वत:वर परिणाम करून घेऊ का ?
तो भेटण्यापूर्वीही मी जगत होतेच की, मग त्याला काहीच अर्थ नाही का ? लोकं काय बोलतात आणि खरी परिस्थिती काय, यात खूप तफावत असते.
19 फेब्रुवारी 2022 मध्ये शिवानी-फरहानने लग्न केलं. ट्रोलिंग होऊनही त्यांच्या नात्यात कोणताच फरक पडलेला नाही.
आराध्या, जा… ऐश्वर्या आणि आराध्याचे बाप्पाच्या दर्शनावेळी हाल; काय घडलं?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा