Urmila Mantondkar : 8 वर्षांचा संसार मोडला, कोण आहे उर्मिलाचा पती मोहसिन ?
25 September 2024
Created By : Manasi Mande
प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा 8 वर्षांचा संसार मोडला. (Photo : Instagram)
तिने पती मोहसिन अख्तर मीर याच्याशी घटस
्फोट घेण्याचा निर्णय घेतलाय.
रिपोर्ट्सनुसार, उर्मिलाने मुंबई न्यायालयात घटस्फोटाची याचिका दाखल केली आहे.
4 फेब्रुवारी 2016 मध्ये उर्मिलाने मोहसिनशी लग्न केलं. तिचा पती नेमका कोण आहे, काय करतो, असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत.
उर्मिलाचा नवरा मोहसिन अख्तर मीर हा बिझनेसमन आणि मॉडेल आहे. 2014 साली त्यांची पहिली भेट झाली.
मॉडेल बनण्याचे स्वप्न बघणारा मोहसिन 21 व्या वर्षी मुंबईत आला. इथे त्याने काही चित्रपटांतही काम केलं.
'इट्स ए मेन्स वर्ल्ड', 'लक बाय चान्स','मुंबई मस्त कलंदर' आणि 'बीए पास' यासारख्या अनेक चित्रपटात तो झळकला.
मात्र चित्रपटसृष्टीत फारस यश न मिळाल्याने त्याने बिझनेस सांभाळण्याचा निर्णय घेतला.
आराध्या, जा… ऐश्वर्या आणि आराध्याचे बाप्पाच्या दर्शनावेळी हाल; काय घडलं?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा