बच्चन परिवारातील भांडणच्या अफवांना पूर्ण विराम लावणारे फोटो अन् व्हिडिओ समोर आले आहे.

5 March 2024

ऐश्वर्या राय आणि श्वेता बच्चन म्हणजेच वहिनी आणि नणंदेमध्ये कमालीचे बॉन्डिंग दिसून आले.

अनंत अंबानी यांच्या प्री वेडिंग समारंभानंतर ऐश्वर्या आणि श्वेता सोबत फिरताना अन् गप्पा मारताना दिसून आल्या. 

ऐश्वर्या आणि श्वेता यांच्या व्हायरल व्हिडिओमध्ये दोन्ही सोबत चालताना दिसतात तर अभिषेक त्यांच्या मागे दिसत आहेत.

विमानतळावर नणंद आणि वाहिनी सोबत दिसल्या. जामनगरवरुन दोघे एकत्रच मुंबईत परतल्या. 

विमानतळावर अजोबा अमिताभ बच्चन यांचा हात पकडत आराध्या चालताना दिसून आली.

आराध्याच्या बदललेल्या हेअर स्टाईलची चर्चा यावेळी रंगली आहे. 

बच्चन परिवारात भांडण नाही, सर्व सुरळीत असल्याचे या व्हिडिओ अन् फोटोंमधून समोर येत आहे.