सिराजसोबतच्या डेटिंगच्या चर्चा? आशा भोसलेच्या नातीने सोडलं मौन
27 January 2025
Created By : Manasi Mande
प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांची नात, गायिका जनाई भोसले सध्या डेटिंग लाइफमुळे चर्चेत आहे. ( Photo : Instagram)
गेल्या काही दिवसांपासून तिचं नाव भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद सिराजसोबत जोडलं जातंय.
जनाईच्या 23 व्या वाढदिवसाचे सेलिब्रिशेन नुकतचं पार पडलं. त्यावेळी जॅकी श्रॉफसह अनेक जवळचे मित्र, कुटुंबीय उपस्थित होते.
त्या पार्टीतील एका फोटोत जनाई आणि सिराज एकमेकांसोबत खळखळून हसत होते, तो फोटो व्हायरल झाला.
जनाई आणि मोहम्मद सिराजचा फोटो समोर येताच सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. दोघंही रिलेशनमध्ये असल्याच्या अफवाही उडू लागल्या.
मात्र आता जनाईने डेटिंगच्या अफवांवर रिॲक्ट करत सत्य सर्वांसमोर सांगितलंय.
जनाईने तिच्या इन्स्टा स्टोरीवर सिराजसोबतचा फोटो शेअर केला आहे. माझा प्रिय भाऊ.. अशी कॅप्शनही तिने लिहीली आहे.
तर सिराजनेही जनाईची स्टोरी री-शेअर करत - मेरी बहना के जैसी कोई बहना नाही... अशी कॅप्शन त्यानेही लिहीली आहे.
जनाई आणि सिराजने या पोस्टद्वारे त्याच्या डेटिंगच्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. दोघही एकमेकांना बहीण-भाऊ मानत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
जनाई ही एक उत्तम गायिका असून अभिनेत्री श्रद्धा कपूरची बहीण आहे. लवकरच ती अभिनयात पदार्पण करणार आहे.
Sania Mirza : सानिया मिर्झाचा बेस्ट फ्रेंड कोण ? तिनेच सांगितलं नाव
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा