बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. क्रितीने आपल्या दमदार अभिनयाने चित्रपटसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

ती तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मिडीयावर सक्रीय असते. ती आपले फोटो आणि व्हिडीओ आधीमधी टाकत असते

क्रितीने तिच्या करिअरची सुरुवात एका जाहिरातीतून केली होती. अभिनेत्री होण्यापूर्वी तिने दीर्घकाळ मॉडेल म्हणून काम केले.

टायगर श्रॉफसोबत 'हिरोपंती' या चित्रपटातून क्रितीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर क्रितीने 'बरेली की बर्फी', 'पानीपत', 'लुका छुपी'सह अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली.

क्रिती तिचा 31 वाढदिवस साजरा करत आहे. आणि त्यानिमित्ताने तिने आपल्या लहानपणाच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत. तसेच तिने लिहलं आहे, Happy Birthday meri jaan ?

ती वडील राहुल सॅनन यांच्या अंगाखांद्यावर खेळताना दिसत आहे. फोटोसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले - 'माझी आवडती व्यक्ती, माझे प्रिय पापा.'

'राब्ता' फेम अभिनेत्री क्रिती सेननने भारतीय पारंपरिक ड्रेस परिधान केला आहे. ती तिच्या आईच्या कुशीत आहे. तिचे वडीलही तेथे आहेत. 

क्रिती सेनन तिची आई गीता सेननसोबतचा फोटो देखिल पोस्ट केला आहे. ज्यामध्ये क्रिती एक सुंदर स्माईल देत आहे. मदर्स डेच्या निमित्ताने त्याने हा फोटो शेअर केला होता.

'राब्ता' फेम अभिनेत्री क्रिती सेननने भारतीय पारंपरिक ड्रेस परिधान केला आहे. ती तिच्या आईच्या कुशीत आहे. तिचे वडीलही तेथे आहेत.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी