‘मिस इंडिया वर्ल्डवाइड 2024’ ध्रुवी पटेलचं गुजरात कनेक्शन; ती आहे तरी कोण?
20 September 2024
Created By : Manasi Mande
अमेरिकेतील ध्रुवी पटेल ही ‘मिस इंडिया वर्ल्डवाइड 2024’ ची विजेती ठरली आहे. (Photos : Instagram)
मिस इंडिया वर्ल्डवाइड स्पर्धेचे विजेतेपद पटाकावणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे, अशा शब्दांत ध्रुवीने तिचा आनंद व्यक्त केला.
ध्रुवी पटेल ही गुजराती अनिवासी भारतीय आहे आणि अमेरिकेतील हॅम्डेन, कनेक्टिकट येथे कुटुंबासाह राहते.
ध्रुवी सध्या कॉम्प्युटर इन्फॉर्मेशन सिस्टमचे शिक्षण घेत आहे.
2023 मध्ये तिच्या मस्तकावर मिस इंडिया न्यू इंग्लंडचा मुकुट विराजमान झाला. तत्पूर्वी तिने मिस ऱ्होड आयलंडचा किताबही जिंकला.
ध्रुवी ही मिस वर्ल्ड अमेरिका स्पर्धेतही सहभागी झाली होती.
तिला फॅशन आणि रॅम्प वर्ल्डमध्ये खूप रस आहे.
मिस इंडिया वर्ल्डवाइड स्पर्धा ध्रुवी जिंकली तर सरीनामच्या लिसा अब्दोएलहकला ‘फर्स्ट रनर अप’ घोषित करण्यात आले.
आई व्हायची भीती वाटते… प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वक्तव्याने खळबळ
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा