सुष्मिता सेनकडे किती आहे संपत्ती ? (photo : freepik)

20 November 2023

Created By : Manasi Mande

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते.

48 वर्षीय सुष्मिताने अनेक सुपरहिट बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले. तिचे लाखो चाहते आहेत.

1994 साली सुष्मिता सेनने मिस यूनिवर्सचा खिताब पटकावला. वयाच्या 18 व्या वर्षी हे विजेतेपद पटकावणारी ती पहिली भारतीय होती.

अभिनेत्रीने हैदराबादमधून एका हिंदी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेतले. सुरूवातीला तिचे इंग्रजी फारसे चांगले नव्हते.  

 जेव्हा तिने मिस युनिव्हर्स स्पर्धेत भाग घेतला तेव्हा एक प्रसंग असा आला, जेव्हा तिला इंग्रजीत विचारण्यात आलेला प्रश्नच समजला नाही. कारण तो खूप कठीण होता.

पण तिने हुशारीने आणि कॉन्फिडन्सने त्याचे उत्तर दिले आणि  मिस यूनिवर्स चा खिताब जिंकला.

सुष्मिताने मेहनतीने बॉलिवूडमध्ये स्वत:चे नाव प्रस्थापित केले. तिच्याकडे कोट्यवधींची मालमत्ता आहे. रिपोर्ट्सनुसार, तिची एकूण संपत्ती 12 दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे 100 कोटी रुपये आहे.

तिला आलिशान गाड्यांचाही शौक आहे. तिच्या कलेक्शनमध्ये BMW, लेक्सस, ऑडी या सह अनेक कार्स आहेत.