ऋषभ पंत याचा शुक्रवारी अपघात झाला

पंतच्या गुडघ्यात फ्रॅक्चर, हाताला आणि पाठीलाही दुखापत झाली आहे

पंतच्या दुखापतीमुळे टीम इंडियासह दिल्ली कॅपिटल्सलाही मोठा फटका बसला आहे

तर ऋषभ पंतच्या उजव्या गुडघ्याच्या लिगामेंटमध्ये बिघाड झाला आहे

पंतला पूर्णपणे बरे होण्यासाठी किमान सहा महिने लागतील

या अपघातामुळे तो काही मोठ्या मालिका-टूर्नामेंटला मुकू शकतो

फेब्रुवारी-मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून तो बाहेर जाऊ शकतो

याशिवाय तो आयपीएलच्या 16 व्या हंगामापासूनही दूर राहण्याचीही शक्यता आहे.

आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिप जी जूनमध्ये होणार आहे त्या विजेतेपदाच्या सामन्यापासून तो दूर राहू शकतो

तर त्याच्या लिगामेंट बिघाडावर बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाकडून उपचार केले जातील, त्यासाठी पंतला परदेशात पाठवता येईल