करवा चौथसाठी अंकिताने पूर्ण विधी करून उपवास सोडला. यादरम्यान अंकिता पती विकी जैनच्या पायाला स्पर्श करत आशीर्वाद घेतला
वरुणने आपल्या पत्नीला गोड खाऊ घालून उपवास उघडताना दिसत आहे. त्याने कॅप्शन लिहिले, #करवाचौथच्या शुभेच्छा.
अभिनेत्री गीता बसरा हिने घरापासून दूर असताना देखिल करवा चौथचा उपवास केला. मात्र दोघांनी व्हिडिओ कॉलद्वारे करवा चौथ साजरा केला. तिने नववधूचा पेहराव केला होता.
कतरिना कैफचा हा पहिला करवा चौथ. तिने पती विकी कौशलसोबतचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती तिच्या सासू आणि सासऱ्यासोबत दिसत आहे. कतरिनाने पिंक कलरची साडी घातली आहे, तर विकी क्रीम कलरच्या कुर्त्यामध्ये दिसत आहे.
बॉलीवूड अभिनेता अनिल कपूरची पत्नी सुनीता कपूरने करवा चौथ मोठ्या थाटामाटात साजरा केला. ज्यात शिल्पा शेट्टी, रवीना टंडन, नीलम कोठारी, महीप कपूर यांच्यासह अनेक स्टार्स पोहचल्या होत्या.
प्रसिद्ध गायिका नेहा कक्करनेही करवा चौथच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि पती रोहनप्रीतसोबतचे फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये नेहा लाल रंगाच्या सूटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
'नागिन' ब्रम्हास्त्र फेम अभिनेत्री मौनी रॉयने तिचा पहिला करवा चौथ पती सूरजसोबत अतिशय क्यूट पद्धतीने साजरा केला. मौनी बाला गोल्डन कलरच्या साडीत सुंदर दिसत होती, तर सूरजही पांढऱ्या कुर्त्यामध्ये सुंदर दिसत होता.
अभिनेत्री रवीना टंडनने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पिवळ्या साडीतील तिचे फोटोही शेअर केले आहेत. गजरे आणि भारी दागिन्यांसह अभिनेत्रीने तिचा लूक पूर्ण केला.
भोजपुरी अभिनेत्री मोनालिसानेही करवा चौथचा उपवास केला. तिने लाल रंगाची साडी नेसली होती. तर तिने पतीसोबतचे शेअर केलेल्या फोटो हे दोघेही खूप क्यूट दिसत आहेत.