हे सेलिब्रिटी आहेत फिटनेस फ्रीक... घरातच बनवलं जिम

09 November 2023

Created By : Manasi Mande

सोशल मीडियावर बॉलिवूडचे सेलिब्रिटी जीमला जातानाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. काही सेलिब्रिटींनी  घरातच जिम तयार केलं आहे.

बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आलिशान बंगल्यात एक जिम तयार केले आहे.

त्यात फक्त अमिताभ बच्चनच नव्हे तर अभिषेक बच्चन, अगस्त्य नंदा आणि नव्या हेदेखील वर्कआऊट करतात.

फिटनेस इक्विपमेंट बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करणाऱ्या दबंग स्टार सलमान खानने त्याच्या घरासोबतच पनवेलच्या फार्म हाऊसमध्येही जिम बनवलं आहे. 

शिल्पा शेट्टीच्या घरातही एक प्रायव्हेट जिम आहे. फिट राहण्यासाठी ती योगासनही करते.

सध्या अमेरिकेत राहणाऱ्या प्रियांका चोप्राच्या आलिशान घरात पर्सनल जिम आहे.

सूत्रांच्या सांगण्यानुसार, अक्षय कुमारच्या घरात एका संपूर्ण मजल्यावर जिम आहे. त्याच्याकडे सर्व प्रकारची फिटनेस मशीन्स आहेत.

किती झालंय अनन्या पांडेचं शिक्षण ? चंकी पांडेच्या लेकीबद्दल या गोष्टी जाणून घ्या..