4 वर्षांनी हार्दिक-नताशाचा संसार का तुटला? खरं कारण पहिल्यांदाच समोर...

24 August 2024

Created By : Manasi Mande

क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोव्हिकच्या विभक्त होण्याच्या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला. 4 वर्षांतच दोघे विभक्त झाले.( फोटो सौजन्य - social media)

पण हार्दिक-नताशाचा संसार का मोडला ? यावर बराच काळ सस्पेन्स कायम होता.

आता टाइम्स नाऊच्या नव्या रिपोर्टमध्ये त्यांच्या विभक्त होण्याचं कारण समोर आलंय. हार्दिकच्या पर्सनॅलिटीमुळे नताशा कम्फर्टेबल नव्हती, अशी माहिती सूत्रांनी दिली.

 हार्दिक खूप शो ऑफ करणारा आहे. तो नेहमी त्याच्यातच मग्न असतो. मात्र नताशाला हे फार काळ सहन करता आलं नाही.

 त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये खूपच अंतर आहे, याची नताशाला जाणीव झाली. तिने हार्दिकच्या पर्सनॅलिटीशी जुळवून घेण्याचा बराच प्रयत्न केला, पण ती कम्फर्टेबल नव्हती.

ही कधीच न संपणारी प्रोसेस होती. मात्र एका पॉईंटनंतर नताशा थकली आणि तिने वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

या निर्णयवार तिने पुनर्विचारही केला, पण हार्दिकच्या वागण्यात काहीच बदल न दिसल्याने ती तिच्या निर्णयावर ठाम राहिली.

वेगळ होणं नताशासाठी खूप कठीण होतं, पण हा निर्णय काही एक-दोन दिवसांत घेतला नव्हता.

हे नातं तिच्यासाठी अशी एक जखम बनली होती, जी सतत ठसठसत रहायची आणि त्याचा नताशाला बराच त्रास झाला.

हार्दिकला लाईमलाइटमध्ये रहायची आवड तर नताशाला आयुष्य खासगी ठेवणं पसंत. वाढत्या वेळेनुसार, त्यांच्यातील अंतर वाढलं अन् त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

 मात्र या दाव्यात किती तथ्य आहे, याची आम्ही पुष्टी करू शकत नाही. कारण हार्दिक-नताशा या विषयावर उघडपणे काहीच बोलले नाहीत.