ट्रेन चुकल्यानंतरही रिफंड! पहा काय करावं लागेल
आपल्या देशात अनेकांच्या प्रवासाची गोडी ही रेल्वे वाढवते
त्यामुळेच दररोज लाखो लोक प्रवास करतात
मात्र तुमची ट्रेन चुकली तर रिफंड मागता येतो, हे कदाचित कोणाला माहित ही नसावे
तिकिटाचे पैसे परत मिळवण्यासाठी प्रवाशाला टीडीआर भरावा लागतो
त्यासाठी स्टेशनवरून ट्रेन सुटताच तुम्हाला एका तासाच्या आत TDR दाखल करावा लागेल
प्रवासी ऑनलाइन आणि ऑफलाइन TDR दाखल करू शकतात
परताव्यासाठी रेल्वेकडून टीडीआर जारी केला जातो. जो अंदाजे 60 दिवसात मिळतो
ऑफलाइनवेळी स्टेशन मास्टरकडे आय-तिकीट जमा करून TDR घेता येतो