Govinda : ICU मध्ये गोविंदा, मामाला भेटण्यासाठी काश्मीराची धावपळ, पण कृष्णा कुठे ?
1 October 2024
Created By : Manasi Mande
मंगळवारी पहाटे अभिनेता गोविंदाला गोळी लागली. त्याच्या स्वत:च्याच रिव्हॉल्वरमधून ही गोळी सुटली .( Photos : Instagram)
गुडघ्याला गोळी लागल्याने गंभीर जखमी झालेल्या गोविंदाला अंधेरीतल्या क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
डॉक्टरांनी त्याच्या पायातली गोळी यशस्वीरित्या काढली असून सध्या तो आयसीयूमध्ये दाखल आहे.
याबद्दल समजताच गोविंदा याची सून अभिनेत्री काश्मीरा शाह त्याच्या भेटीसाठी रुग्णालयात पोहोचली. मात्र गोविंदाचा भाचा कृष्णा अभिषेक दिसला नाही.
टेन्शनमध्ये असलेली , थोडी नर्व्हस अशी काश्मीरा धावतपळत रुग्णालयात ोहोचली, तिचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला.
कृष्णा अभिषेक सध्या परदेशात शूटिंग करत आहे, त्यामुळे तो मामाच्या भेटीसाठी येऊ शकला नाही. मुंबईत येताच मामाची भेट घेऊ असे त्याने सांगितले.
गोविंदाची प्रकृती आता स्थिर असून कोणताही धोका नाही, असे त्याच्या कुटुंबातील सदस्याने सांगितले.
गोविंदा सकाळी कोलकात्याला जाण्याच्या तयारीत होता, तेव्हाच मिसफायर होऊन त्याला गोळी लागली, असे त्याच्या मॅनेजरने नमूद केलं.
ही दुर्घटना घडली तेव्हा त्याची पत्नी सुनीता घरी नव्हती, ती आधीच कोलकाता येथे होती. बातमी समजताच ती तातडीने मुंबईच्या दिशेने निघाली.
आई-वडीलांचे आशीर्वाद आणि तुमच्या शुभेच्छांमुळे आता माझी प्रकृती बरी आहे,असे गोविंदा याने एका ऑडिओ मेसेजद्वारे सांगितलं.
दुसऱ्या धर्मात लग्न करताच प्रसिद्ध अभिनेत्री प्रचंड ट्रोल, लव जिहादपासून… अभिनेत्रीची वेदना काय?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा