चित्रपटातील भूमिका अस्सल वाटावी यासाठी अभिनेते बरीच मेहनत करतात. कोणी भाषा शिकतं, तर कोणी वजन कमी- जास्त करतात.

अशाच काही अभिनेत्रींनी आपल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी त्यांचे केस कापण्यासही मागे पुढे पाहिलं नाही.

मेरी कोम या चित्रपटातील भूमिकेसाठी प्रियांकाचे खूप कौतुक झाले होते. त्यातील एका सीनमध्ये प्रियांकाही केसांविना दिसली.

ऐ दिल है मुश्किल या गाजलेल्या चित्रपटात अनुष्का शर्मा ही कॅन्सरने आजारी दाखवली आहे. त्या भूमिकेसाठी तिनेही टक्कल केले होते. 

द डिझायर या चित्रपटात शिल्पा शेट्टी हीसुद्धा केसांविना दिसली होती. 

बॉलिवूडची सौंदर्यवती अभिनेत्री लिसा रे हिने वॉटर चित्रपटात विधवा महिलेची भूमिका निभावली होती. त्यासाठी तिने टक्कल केले होते.

बाजीराव-मस्तानी या ऐतिहासिक चित्रपटातील भूमिकेसाठी ज्येष्ठ अभिनेत्री तन्वी आझमी यांनीही केस पूर्णपणे काढून टाकले होते.

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनीसुद्धा वॉटर चित्रपटातील भूमिकेसाठी टक्कल केले होते.

टीव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेट ही बेहद मालिकेत एका सीनमध्ये केसांविना दिसली होती. तिनेही संपूर्ण केस काढले.

पितृऋण या चित्रपटासाठी ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांनीही टक्कल केले होते.

टीव्ही मालिकेतील एका सीनमध्ये अभिनेत्री निया शर्माही केसांशिवाय दिसली होती. तिचे यासाठी बरेच कौतुकही झाले होते.