बाऊन्सरकडून गैरवर्तन, धक्काही मारला... गणरायाच्या मंडपात अभिनेत्रीसोबत काय घडलं ?
13 September 2024
Created By : Manasi Mande
'कुमकुम भाग्य' आणि 'पंड्या स्टोर' फेम प्रसिद्ध अभिनेत्री सिमरन हिचा शॉकिंग व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला असून चर्चेचा विषय ठरलाय.
नुकतीच ती आईसह लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेली होती, पण तिला तिथे खूप खराब अनुभव आला.
लालबागचा राजा मंडळातील स्टाफ आणि बाऊन्सरनी अभिनेत्रीसोबत गैरवर्तन केलं.
दर्शनासाठी गेलेल्या अभिनेत्रीशी गणपती मंडळाच्या बाऊन्सरनी गैरवर्तन केलं.
दर्शनादरम्यान सिमरन व तिची आई फोटो क्लिक करत असताना हा सर्व प्रकार सुरू झाला.
तेव्हा स्टाफमधील एका मेंबरने तिच्या आईच्या हातातील फोन खेचून घेतला. त्यांनी फोन परत मागिल्यावर सिमरनच्या आईला धक्काही दिला.
असं करू नका, म्हणत अभिनेत्री तिथे ओरडताना दिसली. निराशा व्यक्त करणारी एक पोस्टही तिने लिहीली आहे.
अभिनेत्रीसोबत झालेलं गैरवर्तन पाहून चाहते भडकलेत. सेलिब्रिटींना ही वागणूक तर सामान्य माणसांचे काय हाल, असा सवाल काहींनी विचारला.
अंबानी कुटुंबात कोणती सून सर्वाधिक शिकलेली? श्लोका की राधिका?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा