Prajakta Koli : नवरी नटली, हळद लागली... प्राजक्ताला लावली वृषांकची उष्टी हळद

25 February 2025

Created By : Manasi Mande

मोस्टली सेन या नावाने ओळखली जाणारी प्राजक्ता कोळी ही घराघरात पोहोचली.

तिच्या सहजसुंदर आणि विनोदी कंटेंटमुळे प्रेक्षकांनी तिला डोक्यावर घेतलं.

प्राजक्ता आयुष्यात नव्या प्रवासाला सुरूवात करत असून वृषांक खनालसोबत लग्नबंधनात अडकणार आहे.

तिच्या मेहेंदीचे फोटो सर्वत्र व्हायरल झाले होते. तर काल तिच्या हळदीचा सोहळा पार पडला.

24 फेब्रुवारी रोजी तिच्या हळदी सोहळ्याचे रंग गडद झाले. इन्स्टाग्रामवर प्राजक्ताने स्वतः  काही फोटो शेअर केले.

प्राजक्ता आणि वृषांक दोघांनीही हळदी सेरेमनीमध्ये धम्माल डान्सही केला.

यावेळी प्राजक्ताने हातात फक्त बांगड्याच घातल्या नव्हत्या तर  खऱ्याखुऱ्या पांढऱ्या फुलांचे कलीरे घातले होते.

वृषांक खनालनेही आपल्या होणाऱ्या बायकोसोबत व्हाईट ड्रेसमध्ये ट्विनिंग केलं होतं.

प्राजक्ता आणि तिचा होणारा नवरा वृषांक हे दोघे 13 वर्षांपासून एकत्र असून आता ते विवाह बंधनात अडकणार आहेत.