वाघोबाच्या फोटोनंतर रवीनावर टीकांची बरसात
90 च दशक गाजवणारी बॉलीवूड अभिनेत्री रवीना टंडन
ती नुकतीच मध्य प्रदेशातील सातपुडा व्याघ्र प्रकल्पात दिसली
रवीना शूटिंगसाठी मध्य प्रदेशात गेली होती
यादरम्यान तिने सफारीचे काही खास व्हिडिओ तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत
यात ती सातपुड्याच्या व्याघ्र प्रकल्पात निर्भयपणे फिरताना दिसली
यावेळी तिने वाघाचा अगदी जवळून फोटो काढला
यावरून तिच्यावर आता टीका होताना दिसत आहे
तर रवीनाने जंगल नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप देखील होत आहे