माझं लग्न झालंय, पण...सलमान अचानक बोलला, शाहरूख हैराण !

15 August 2024

Created By : Manasi Mande

दबंग स्टार सलमान खान लग्न कधी करणार, हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. पण माझं  आधीच झालंय, या सलमानच्या विधानाने सर्वांनाच धक्का बसला.

सलमानचं हे वाक्य ऐकून शाहरुख खानसह सर्वच हैराण झाले. सलमानचं सीक्रेट वेडिंग झालं तरी कधी  ? असा प्रश्न सर्वांच्या मनात आला.  

तुझं लग्न झालंय ? हे कधी झालं ? असा सवाल शाहरुखने त्याला  विचारला.

लग्नाला खूप वेळ उलटलाय. ज्यांनी मला प्रश्न विचारून भंडावून सोडलंय त्यांना मी सांगू इच्छितो 18 नोव्हेंबरला माझं लग्न झालं, असं सलमानने सांगितलं.

ती मुलगी कोण ? असं विचारल्यावर सलमान म्हणाला - बराच काळ मी हे लपवलं, पण आता सत्य समोर आलंच आहे.

एक तरूणी नेहमी माझ्या स्वप्नात येते, मी नर्व्हस होतो आणि झोपेतून जाग येते. मी तिला कधीच पाहिलं नाही.

जगातल्या सगळ्या मुलींना ज्याच्याशी लग्न करायचंय तो स्वप्नातही लग्नाबद्दल विचार करून नर्वह्स होतो, अशी मजा करत शाहरुख हसला.

मला लग्नात रस नाही पण मुलांवर खूप प्रेम आहे. मला मुलं हवी आहेत. पण त्यांच्यासोबत आईदेखील येईल, जे मला मंजूर नाही, असं सलमानने स्पष्ट केलं.

सलमान खानच्या या उत्तराची बरीच चर्चा झाली.