आता 'बिग बॉस 16' दिसणार 'कांटा लगा गर्ल' शेफाली
सलमान खानचा बिग बॉस शो हा टीआरपीच्या यादीत वरच्या स्थानावर आहे
या शोमध्ये आपल्याला प्रियंका चहर चौधरीपासून अर्चना गौतमपर्यंत पहायला मिळत आहेत
पण आता लवकरच बिग बॉस 16 च्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे
ही वाईल्ड कार्ड एन्ट्री दुसरी तिसरी कोण नसून बिग बॉस 13 ची स्पर्धक 'कांटा लगा गर्ल' शेफाली जरीवाला आहे
शेफाली जरीवालाने बिग बॉस 16 मध्ये परत येण्याची मुलाखतीदरम्यान इच्छा व्यक्त केली होती
सध्या ती वेब सीरिजवर जास्त लक्ष केंद्रित करत आहे
अब्दू रोजिक हा माझा आवडता स्पर्धक असल्याचे शेफालीने सांगितले