प्रत्येक स्त्रीने आई व्हायलाच हवं का? उर्मिला मातोंडकर स्पष्टच बोलली

4 February 2025

Created By : मयुरी सर्जेराव

उर्मिलाने 42 व्या वर्षी बिझनेसमन मोहसीन अख्तर याच्याशी 2016 मध्ये लग्न केलं होतं.

उर्मिलाने लग्नाच्या 8 वर्षानंतर मोहसीनसोबत घटस्फोट घेतला.

एका मुलाखतीमध्ये उर्मिलाचं लग्न झाल्यानंतर तिला बाळाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.

तेव्हा तिने म्हटलं होतं की, "मी याबद्दल फार विचार केला नाही, पण कधी कधी विचार येतो"

" पण प्रत्येक स्त्रीने आई व्हायलाच हवं का?", असा प्रश्न तिने विचारला होता.

"जगात असे अनेक मूलं आहेत ज्यांना प्रेमाची गरज आहे. ते मूल आपलंच असलं पाहिजे असं काही नाही"

"तुम्ही एखादं मूल दत्तक घेऊ शकता", असं म्हणतं उर्मिलाने तिचं मत व्यक्त केलं होतं.

दरम्यान आज (4 फेब्रुवारी) उर्मिलाचा 51 वाढदिवस आहे.

उर्मिलाची नेटवर्थ 60 करोडपेक्षाही जास्त असल्याचं म्हटलं जातं.