आई व्हायची भीती वाटते... प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वक्तव्याने खळबळ
12 September 2024
Created By : Manasi Mande
'स्त्री 2' मध्ये तमन्ना भाटियाच्या 'आज की रात' गाण्याने धूमाकूळ घातलाय. या गाण्याला 100 मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळालेत. (Photo : Instagram)
तमन्नाने नुकतच एका पॉडकास्टमध्ये तिच्या आयुष्याबद्दल अनेक महत्वाच्या गोष्टी शेअर केल्यात.
मला मुलं जन्माला घालण्याची भीती वाटते असं तमन्ना म्हणाली.
मी त्या बाळाला एवढं प्रेम कसं देऊ शकेन, एवढी काळजी घेऊ शकेन का याची चिंता वाटते.
माझ्या आई-वडिलांनी मला खूप प्रेमाने वाढवलं, प्रचंड पॅम्पर केलं.
त्यामुळेच मला आता बाळाला जन्म द्यायची भीती वाटते. मी तेवढी प्रेमाने सगळं करू शकेन का, याची चिंता वाटते, असं तमन्ना म्हणाली.
तमन्नाने तिची भावना तर मनमोकळेपणे सांगितली. आता लग्नानंतर तिचा निर्णय कायम राहतो की बदलतो हे येणाऱ्या काळात समजेलच.
तमन्ना सध्या अभिनेता विजय वर्माला डेट करत आहे. दोघांनी अधिकृतरित्या त्यांचं नातं स्वीकारलंय.
अंबानी कुटुंबात कोणती सून सर्वाधिक शिकलेली? श्लोका की राधिका?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा