IPL 2023 चा 16 वा हंगाम

IPL 2023 च्या लिलावात यंदा 405 खेळाडू असणार आहेत. यापैकी 273 भारतीय आणि उर्वरित 132 परदेशी खेळाडू असतील

119 कॅप्ड क्रिकेटर आहेत आणि इतर 296 अनकॅप्ड खेळाडू आहेत

सर्व 10 फ्रँचायझींना मिळून एकूण 87 स्लॉट भरायचे आहेत, ज्यामधून जास्तीत जास्त 30 परदेशी खेळाडू खरेदी करता येतील

आधी खेळाडू नोंदणी करतात. यावेळी 15 देशांतील 991 खेळाडूंनी लिलावासाठी नावे दिली. त्यापैकी 369 खेळाडूंना लिलावासाठी निवडण्यात आले. त्यानंतर आणखी 36 खेळाडूंचा समावेश करून संख्या 405 झाली

लिलावकर्ता खेळाडूंची नावे आणि त्यांच्या मूळ किमती सांगतो. यावर, फ्रँचायझी आपले पॅडल लावतात. ज्या खेळाडूची सर्वाधिक रकमेची बोली लागते तो त्या संघाचा खेळाडू बनतो

एखाद्या खेळाडूसाठी फ्रँचायझीने पॅडल उचलले नाही, तर तो 'अनसोल्ड' समजला जातो

कसोटी, एकदिवसीय किंवा T20 सामने खेळले आहेत ते खेळाडू कॅप्ड श्रेणीत येतात

आणि एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही, त्याला अनकॅप्ड म्हटले जाते

एका संघात जास्तीत जास्त 25 खेळाडू असू शकतात. त्यात जास्तीत जास्त आठ विदेशी खेळाडू 

फ्रँचायझींना राईट टू मॅच कार्डद्वारे जुन्या खेळाडूंना घेता येतं. पण सर्वोच्च बोलीएवढी किंमत मोजावी लागते