सोहेल-सीमा प्रेम कहाणी
बॉलीवडूचा दबंग खान याची अनेक प्रेम प्रकरणे झाली. मात्र त्याचे लग्न काही झाले नाही. पण सलिम खान-सुशीला, अरबाज आणि मलायका यांची प्रेम कहाणी चांगलीच गाजली
सोहेल खान आज (20 डिसेंबर) त्याचा 52 वा वाढदिवस साजरा करत आहे
त्याची प्रेम कहाणी आणि लग्न सध्या चर्चेत आहे. ती जरा हटके आणि ब्लॉकबस्टर चित्रपटापेक्षा काही कमी नाही
सोहेल त्यावेळी करिअर करण्यासाठी धडपडत होता. तर दिल्लीची सीमा सचदेव करिअरसाठी मुंबईत आली होती
यादरम्यान सीमा आणि सोहेलची पहिली भेट झाली. आणि डेटींग सुरू झाली
त्यानंतर एका रात्री सोहेलने सीमाला पळवून गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये आणले
पण असं राहता येणार नाही, तिच्याशी लग्न करावे लागेल. या सलीम खान यांच्या आदेशानुसार मौलवीसाहेबांचा शोध सुरू झाला
जवळच्या मशिदीजवळ मौलवीसाहेब चालताना त्यांच्या मित्रांनी दिसले. आणि त्यांचे जणू अपहरणच केलं
त्यामुळे मौलवीसाहेब रागाने लाल झाले होते. मात्र सलीम खान यांना पाहताच तो राग उतरला
त्याचबरोबर मौलवीसाहेब म्हणाले, मला समजले होते, फक्त तुमचा मुलगाच असे कृत्य करू शकतो. आणि मग लग्न झालं