चाहत्यांना वेड लावणारी गौतमी पाटील
गौतमी पाटील गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे
तिच्या नृत्यात अश्लीलता आहे म्हणत कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी होत आहे
गौतमीच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरीमुळे एका चाहत्याचा मृत्यू झाला होता
त्यानंतर चाहत्यांनी थेट स्टेजवर चढून धिंगाणा घातल्याचा प्रकारही घडला होता
अश्लीलता आणि चाहत्यांचा धिंगाणा यावरून गौतमीच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी होत आहे
माझ्या कार्यक्रमांना विरोध का केला जातोय हे मला माहिती नाहीये, कार्यक्रमांवर बंदी आणण्याचं काही कारण नसल्याचे तिने म्हटलं आहे
त्याचबरोबर आपल्या नृत्यात कुठेही अश्लीलता नाही. आधी जे झालं त्याबाबद्दल मी माफी मागितल्याचंही तिनं म्हटलं आहे
तर इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकीमधील कार्यक्रम सुरक्षेचं कारण देत गावकऱ्यांनी गौतमीचा रद्द केला