आता तुम्हीही... प्रेग्नन्सीच्या गुड न्यूजमध्ये प्रसिद्ध अभिनेत्रीची हैराण करणारी पोस्ट

17 August 2024

Created By : Manasi Mande

अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी ही कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. तिच सोशल मीडियावर जबरदस्त फन फॉलोईंग आहे.

'साथ निभाना साथिया'मधून लोकप्रिय झालेल्या देवोलिनाने चाहत्यांना गुड न्यूज दिलीय. ती लवकरच आई होणार आहे.

तिने स्वत:च इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट करून ही आनंदाची बातमी सर्वांसोबत शेअर केलीये.

देवोलीना भट्टाचार्जी ही प्रेग्नंट असल्याची चर्चा सतत सुरू होती, अखेर आता तिने याबद्दल स्वत:च अपडेट्स दिले.

देवोलीनाचा ‘पंचामृत’ विधी पार पडला. त्या विधीचे काही फोटो शेअर करत तिने आई होणार असल्याची गुड न्यूज सर्वांना दिली.

त्यासाठी तिने हिरव्या रंगाची सुंदर साडी नेसली होती.

देवोलिना, तिचा पती शानवाज , व लाडका श्वान यांच्यासह  शेअर केलेल्या एका फोटोत तिने हातात लहान बाळाचा ड्रेस पकडलाय

'आता तुम्ही (प्रश्न) विचारणं बंद करू शकता' असेही त्या ड्रेसवर लिहीलं आहे.

देवोलिनाने शेअर केलेल्या या फोटोंनंतर अनेक सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्या आहेत.