ज्येष्ठ कलाकार कैकला सत्यनारायण
कैकला सत्यनारायण हे तेलुगू चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चेहरा आणि ज्येष्ठ कलाकार होत
आज कैकला सत्यनारायण यांचे 87 व्या वर्षी रुग्णालयात निधन झाले
कैकला सत्यनारायण बरेच दिवसापासून आजारी होते
त्याच्या जाण्याने तेलुगू चित्रपटसृष्टीसह चाहत्यांना धक्काच बसला आहे
दिग्गज कलाकार आणि चाहते त्यांना अश्रूपूर्ण श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत
कैकला सत्यनारायण यांचा नागेश्वरम्मा यांच्याशी 10 एप्रिल 1960 रोजी विवाह झाला होता
सत्यनारायण यांनी त्यांच्या 55 वर्षांच्या कारकिर्दीत 770 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले
तर ते चित्रपटांव्यतिरिक्त राजकारणातही सक्रिय होते त्यांनी संसद सदस्य म्हणून लोकांची सेवा केली