दीपिका पल्लीकल ही टीम इंडियाचा विकेटकीपर दिनेश कार्तिकची पत्नी आहे.

दीपिका पल्लीकल तिच्या अप्रतिम सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत असते. 

कार्तिकप्रमाणेच दीपिकाही ॲथलिट आहे. ती भारताचं प्रतिनिधीत्व करते.

ती भारताची स्क्वॅश प्लेअर आहे. तिच्या नावावर अनेक विक्रम आहेत. 

तिने जोशना चिन्नप्पाच्या साथीने 2014मध्ये 'कॉमनवेल्थ'मध्ये सुवर्णपदक पटकावलं होतं. 

वयाच्या 10व्या वर्षापासूनच ती स्क्वॅश खेळते. तिला अर्जुन पुरस्कारानेही गौरवण्यात आलंय. 

दिनेशसोबत तिने 2015मध्ये विवाह केला. दीपिका ही दिनेशची दुसरी पत्नी आहे. 

दीपिकाला जुळी मुले आहेत. तरीही तिचा फिटनेस वाखाणण्यासारखा आहे.