भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षतील चतुर्थीला गणेश उत्सव साजरा  केला  जातो.

23th Aug 2024

Created By: Jitendra Zavar

यंदा 7 सप्टेंबर 2024 रोजी गणेश चतुर्थी येत आहे. 10 दिवसाचा हा उत्सव जल्लोषात साजरा होणार आहे. 

गणेश उत्सवाचा समारोप अनंत चतुर्दशीला 17 सप्टेंबर 2024 रोजी होणार आहे.  

गणेश चुतुर्थी 6 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 3 वाजून 1 मिनिटाने सुरु होणार आहे. 7 सप्टेंबर 2024 रोजी संध्याकाळी 5 वाजून 37 मिनिटांनी समारोप आहे.

गणेश चतुर्थीला गणेश पूजेचा मुहूर्त सकाळी 11:10 वाजेपासून दुपारी 1:39 मिनिटांपर्यंत आहे. 

गणेश चतुर्थीला वर्जित चंद्रदर्शन सकाळी 9:28 रात्री 8:59 पर्यंत आहे. 

गणेश उत्सव दहा दिवस साजरा केला जाणार आहे. त्या दरम्यान विधिवत पूजा अर्चना केली जाते.

महाराष्ट्रात सर्वत्र गणेश उत्सवाचा उत्सव जोरात असतो. पुणे-मुंबईचा उत्सव पाहण्यासाठी देशभरातून गणेशभक्त येतात.