नवीन वर्षाच्या सुरुवातीला 'हे' सिनेमे होणार प्रदर्शित

आरआरआर

7 जानेवारी 2022 रोजी 'आरआरआर'  चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  या चित्रपटामध्ये लोकप्रिय कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. आरआरआर  चित्रपटात अजय देवगण, आलिया भट्ट,  ज्यूनियर एनटीआर आणि राम चरण या  कालाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे

कौन बनेगी शिखरवती

'कौन बनेगी शिखरवती'  ही वेबसीरिज 7 जानेवारी  2022 रोजी झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या वेबसीरिजचे  दिग्दर्शन गौरव चावला आणि अनन्या बनर्वीने केले आहे. या वेबसीरिजमध्ये  नसीरुद्दीन शाह राजाची भूमिका साकारणार आहे

ये काली काली आंखें

'ये काली काली आंखें' ही सिद्धार्थ सेनगुप्ता दिग्दर्शित बहुप्रतिक्षित  वेबसीरिज आहे. ताहिर राज भसीन, श्वेता त्रिपाठी आणि आंचल सिंह यांच्या या  सीरिजमध्ये मुख्य भूमिका आहेत. ही वेबसीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार  असून 14 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

राधे श्याम

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा आगामी 'राधे श्याम' सिनेमा 14 जानेवारीला बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालणार आहे. या  सिनेमात प्रभाससोबत पूजा हेगडेदेखील मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट तमिळ, तेलुगु, मल्याळम सोबत हिंदी भाषेतदेखील प्रदर्शित होणार आहे

पृथ्वीराज

पृथ्वीराज या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केले  आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसह संजय दत्त आणि सोनू सूद महत्वपूर्ण  भूमिकेत दिसणार आहेत. मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर या सिनेमात 'संयोगिता'च्या  भूमिकेत असणार आहे

अटॅक

जॉन अब्राहम, जॅकलीन फर्नांडिस आणि रकुल प्रीत यांचा 'अटॅक' हा चित्रपट 28  जानेवारीला सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. अटॅक हा थरार नाट्य असलेला  सिनेमा आहे. या सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. प्रेक्षक आता  सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत