श्रावणातील तिसरा सोमवार, विठ्ठल मंदिराला फुलांची आरास
आज तिसरा श्रावणी सोमवार असल्याने सावळया विठुरायाच्या आणि रुक्मिणी मातेच्या मंदिराला आकर्षक रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आले आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचा गाभारा सोळखांबी, चारखांबी तसेच मंदिराच्या विविध भागांना आकर्षक फुलांची आरास करण्यात आली आहे.
विठुरायाच्या आणि रुक्मिणी मातेच्या मंदिराला सजवण्यासाठी एक टन फुलांचा वापर करण्यात आला आहे.
विविध रंगाच्या फुलांनी देवाचा गाभारा उजळून निघाला आहे.
पांडुरंगाचं आजचे गोजिरे रुप अधिकच खुलून दिसत आहे.