मुलांची उंची नीट न वाढण्यामागे अनेक कारणे असतात. 

 अयोग्य आहार, चुकीची जीवनशैली व अनुवांशिकतेमुळे उंची पटकन वाढत नाही. 

काही उपायांच्या सहाय्याने शारीरिक विकासात मदत होऊ शकते. 

मुलांना कमीत कमी 7 ते 8 तास झोप मिळणे आवश्यक आहे. ज्यामुळे शरीराच्या संपूर्ण विकासात मदत होते.

स्ट्रेचिंग व्यायाम हा उंची वाढण्यासाठी फायदेशीर ठरतो. त्यामुळे उंची चांगली वाढू शकते. स्ट्रेचिंगमुळे स्नायू मजबूत होतात.

नियमित व्यायाम केल्याने उंची वाढण्यास मदत होते. मुलांचे पोश्चरही सुधारते.

सप्लीमेंट्स बिलकूल देऊ नका, ते हानिकारक ठरू शकते. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच अशी औषधे द्यावीत. 

मुलांना पौष्टिक व संतुलित आहार दिल्याने ते उंची वाढण्यासाठी फायदेशीर ठरते.