लहान मुलांची हाडं मजबूत करण्यासाठी त्यांच्या आहारात चांगल्या , पौष्टिक खाद्यपदार्थांचा समावेश केला पाहिजे.

दुधामध्ये अनेक चांगली पोषक तत्वं असतात. त्यामध्ये कॅल्शिअम आणि प्रोटीन्स जास्त प्रमाणात असतात, जे मुलांसाठी फायदेशीर असते.

दही हा एक असा पदार्थ आहे, जो आरोग्यासाठी खूप लाभदायक असतो. ते कॅल्शिअमयुक्त असते.

चीज खूप चविष्ट असते, जे हाडांच्या घनतेसाठी (डेंसिटी) खूप चांगले मानले जाते. पण हे मुलांना एका ठराविक प्रमाणातच खायला द्यावे.

पालकामध्ये व्हिटॅमिन के मुबलक असते, ज्यामुळे हाडं अतिशय मजबूत होतात.

ब्रोकोलीमध्येही व्हिटॅमिन के आणि कॅल्शिअम मुबलक प्रमाणात असते. ज्यामुळे आपली हाडं खूप मजबूत होतात.

मशरूम्समध्ये अनेक आवश्यक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. त्यामध्ये व्हिटॅमिन बी, सी आणि डी असते, जे हाडांसाठी खूप फायदेशीर असते.