नवी दिल्लीत सुरु असलेल्या दोन दिवशी G20 स्पर्धेचा समारोप रविवारी झाला. यानंतर ब्राझीलकडे अध्यक्षपद देण्यात आले.

G20 परिषदेसाठी जगभरातून महत्वाच्या देशांचे प्रमुख आले होते. या परिषदेत विदेशी माहिला साडी अन् सुटमध्ये आल्या.

अनेक विदेशी माहिलांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बोलवेल्या शाही भोजनात पारंपारिक भारतीय वेशभूषेत हजेरी लावली. 

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या उपव्यवस्थापकीय संचालक गीता गोपीनाथ या साडी परिधान करुन वावरत होत्या. 

मॉरीशसचे पंतप्रधान प्रविंद जुगन्नाथ यांची पत्नी कोबिता यांनीही साडी परिधान केली होती.

जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांची पत्नी युको किशिदा यांनीही साडी परिधान करुन भारतीय वस्त्रभूषेबद्दल आपले आकर्षण दाखवले.

G20 समिटमध्ये आलेल्या पाहुण्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अनेक शाकाहारी पदार्थ असलेल्या जेवणाचे मेन्यू ठेवले होते. 

आता पुढील G20 समिट ब्राझीलमध्ये होणार आहे. ब्राझीलचे राष्ट्रपती लूला डा सिल्वा यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील G20 ची सूत्र दिली.