महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन
23 February 2024
Created By : Manasi Mande
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, कट्टर शिवसैनिक, मनोहर जोशी यांचं आज ( 23 फेब्रुवारी) पहाटे निधन झालं.
हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 86 वर्षांचे होते.
शिवसेनेचा सुवर्णकाळ पाहिलेल्या मनोहर जोशी यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली राजकारणाचे धडे गिरवले.
मनोहर जोशी यांनी राजकीय कारकीर्दीत मुंबईचे महापौरपद, राज्याचे मुख्यमंत्रीपद आणि लोकसभेचे अध्यक्ष अशी प्रतिष्ठित पदं भूषवली.
1995 साली राज्यात युतीची सत्ता आल्यावर मनोहर जोशी राज्याचे मुख्यमंत्री बनले. 'नांदवी ते वर्षा' असा त्यांचा राजकीय प्रवास होता.
प्रकृतीच्या कारणास्तव गेल्या काही काळापासून ते राजकारणात सक्रिय नव्हते.
त्यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळातूनच नव्हे तर सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे. अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.