कोहलीसोबतच्या वादावर गौतम गंभीरचं थेट वक्तव्य, म्हणाला..
28 April 2024
Created By: Rakesh Thakur
आयपीएल 2024 स्पर्धेत विराट कोहली आणि गौतम गंभीरला एकत्र पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
मागच्या पर्वात विराट आणि गंभीरमध्ये वाद झाला होता. त्यामुळे चर्चांना उधाण आलं होतं.
आयपीएल 2024 स्पर्धेत असंच काहीसं पाहायला मिळेल असं वाटत होतं. त्यामुळे प्रत्येक जण या पर्वाची वाट पाहात होतं.
आयपीएल 2024 स्पर्धेत तसं काही झालं नाही. दोघंही एकत्र आले आणि हसत हसत एकमेकांना भेटले.
विराटने एका कार्यक्रमात सांगितलं की, बऱ्याच लोकांच्या पदरी निराशा पडली. कारण त्यांच्या हाती काहीच मसाला लागला नाही.
गौतम गंभीरने सांगितलं की, मीडिया सर्वकाही टीआरपीसाठी करते. कारण त्यांना माहिती नाही की तो कसा व्यक्ती आहे. मीडिया फक्त वातावरण निर्मिती करते.
गंभीरने सांगितलं की, विराटकडून काय शिकायचं झालं तर मी त्याच्या डान्स मूव्हमेंट शिकेन. कारण माझ्याकडून तसं काही होत नाही.