गणेशोत्सव नियमावली

2021

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी महापालिका/स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार पूर्व परवानगी घेणे आवश्यक.

गणेशोत्सव नियमावली

कोरोना परिस्थितीचा विचार करता महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपांबाबतच्या धोरणानुसार मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत.

गणेशोत्सव नियमावली

या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतींची सजावट करतांना त्यात भपकेबाजी नसावी.

गणेशोत्सव नियमावली

सार्वजनिक मंडळांकरिता 4 फूट तर घरगुती गणपतीकरिता 2 फूट उंचीच्या गणेशमूर्तीची मर्यादा.

गणेशोत्सव नियमावली

शक्यतो पारंपारिक गणेशमूर्तीऐवजी घरातील धातू/संगमरवर मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची/ पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन घरीच करावे.

गणेशोत्सव नियमावली

विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रीम विसर्जनस्थळी विसर्जन करण्यात यावे, मात्र गर्दी टाळावी.

गणेशोत्सव नियमावली

उत्सवाकरिता वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे.

गणेशोत्सव नियमावली

गणेशोत्सवादरम्यान आरोग्य विषयक आणि सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात आली आहे.

गणेशोत्सव नियमावली

सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम आयोजित करावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू या रोगांबाबत जनजागृती करण्यात यावी.

गणेशोत्सव नियमावली