रोग पळवा

तुळस

खा

रोग पळवा

तुळस खा

रोग प्रतिकारशक्तीसाठी

तुळशीच्या बियांमध्ये फ्लेवोनाईड आणि फेलोनिक असल्याने ते आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यास मदत करतात. तुळशीमध्ये असणारे अॅंटीऑक्सिडंट शरीराला होणा-या फ्री रेडीकल्सच्या प्रभावापासून संरक्षित करतात.

रोग पळवा

तुळस खा

सर्दी-पडश्यावर लाभदाय

तुळस सर्दी-पडश्यावर अत्यंत गुणकारी आहे. तुळशीतील अॅंटीमायक्रोबियल घटक सर्दी-पडश्यापासून मुक्तता मिळवून देतात. यासोबतच तुळशी, काळेमिरे आणि खडीसाखर मिसळून प्यायल्यानेही सर्दी-पडसे ठिक होते.

रोग पळवा

तुळस खा

तापावर उपयुक्त

तुळस तापासाठी देखील उपयुक्त मानली जाते. तीव्र ताप असल्यास अर्धा लीटर पाण्यात वेलची पावडर, साखर आणि दूध याबरोबर तुळशीची पाने उकळून घ्यावी. तीन तासांच्या अंतराने हा काढा रुगणाला दिल्यास ताप कमी होतो. 

रोग पळवा

तुळस खा

मुरूमांवरही गुणकारी

तुळशीची काही पाने, संत्र्याची साल त्यात गुलाबजल मिसळा, त्याची पेस्ट करा. ही पेस्ट 15 मिनिटे चेह-यावर लावून ठेवा आणि नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. यामुळे तुमच्या चेह-यावरील मुरूम जाऊन चेहरा उजळण्यास सुरूवात होईल. 

रोग पळवा

तुळस खा

डोकेदुखीवर फायदेशीर

तुळशीची पाने डोकेदुखीवरील रामबाण उपाय म्हणून ओळखली जातात. तुळशीच्या वाळलेल्या पानांची गरम पाण्यात वाफ घेणे हा सर्वात चांगला उपाय आहे. तसेच तुळशीची पाने वाटून चंदनाच्या लेपाबरोबर डोक्यावर लावणेही उत्तम!