त्वचेवर  गुणकारी बटाट्याची  साल

त्वचेवर  गुणकारी  बटाट्याची  साल

कचरा समजून फेकून दिल्या जाणाऱ्या बटाट्याच्या सालीत अनेक औषधी गुणधर्म आहेत. बटाट्याची साल ही फक्त त्यातील पोषक तत्वासाठीच ओळखली जात नाही, तर वजन कमी करण्यासाठी आणि उच्च रक्तदाबासारख्या अनेक व्याधींवर गुणकारी असल्याचे म्हटले जाते

बटाट्याच्या सालाचे गुणधर्म

त्वचेवर  गुणकारी  बटाट्याची  साल

बटाट्याची साल ही Vitamin-C चे पॉवरहाऊस म्हणून ओळखले जाते. हे प्रभावी अँटिऑक्सिडेंट म्हणून काम करते. याशिवाय या सालांमध्ये कॅल्शियम, व्हिटामिन सी आणि बी कॉम्पलेक्ससोबतच आयर्न देखील भरपूर प्रमाणात असते जे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.

बटाट्याच्या सालाचे गुणधर्म

त्वचेवर  गुणकारी  बटाट्याची  साल

आपले सौंदर्य उजळवण्यासाठी देखील बटाट्याची साल उपयुक्त आहे. डोळ्यांखालील काळ्या डागापासून ते केसांना नैसर्गिक रंग देण्यापर्यंत बटाट्याच्या सालीचा वापर होते.

बटाट्याच्या सालाचे गुणधर्म

त्वचेवर  गुणकारी  बटाट्याची  साल

डार्क सर्कल्स समस्येवर मात करण्यासाठी आपण डोळ्याखाली बटाट्याची साल वापरू शकता. बटाटाची साल बारीक करून त्याचा रस काढा आणि कापसाच्या सहाय्याने डार्क सर्कल्सवर लावा. आपण आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा रस त्वचेवर लावू शकता.

डार्क सर्कल्स

त्वचेवर  गुणकारी  बटाट्याची  साल

पांढऱ्या केसांना नैसर्गिक रंग देण्यासाठी आपण बटाट्याचे साल वापरू शकता. बटाट्याच्या सालाची एक वाटी अर्धा लिटर पाण्यात उकळा आणि जेव्हा हे पाणी आटून केवळ, चार ते पाच चमचे शिल्लक राहील तेव्हा आच बंद करून, थंड झाल्यावर ते केसांच्या मुळांवर लावा. काही वेळाने केस स्वच्छ धुवा.

केसांना नैसर्गिक रंग

त्वचेवर  गुणकारी  बटाट्याची  साल

नितळ आणि सुंदर त्वचा मिळवण्यासाठी सर्व प्रथम एक छोटा बटाटा किसून घ्या. नंतर बटाट्याच्या रसामध्ये अर्धा चमचा गुलाब पाणी मिक्स करा आणि बाजूला ठेवून द्या. आता आपला चेहरा पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावा. यानंतर किसलेला बटाटा आपल्या चेहऱ्यावर लावा आणि चेहऱ्याचा १० मिनिटे हलक्या हाताने मसाज करावा. 

नितळ-सुंदर त्वचा