तुळशीचे आरोग्यदायी  गुणधर्म

तुळशीतील अँटी-बॅक्टेरियल घटक खोकला, सर्दी, पडसे यासारख्या समस्यांना आपल्यापासून दूर ठेवतात आणि श्वसन प्रणाली अधिक बळकट बनवतात. याशिवाय तुळशीची पाने पचन क्रियेसंदर्भातील समस्या दूर करतात

तुळशीच्या पानांमध्ये असलेले अ‍ॅडाप्टोजेन ताण कमी करण्यास मदत करते. याचे नियमित सेवन केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि नर्व्हस सिस्टीमला आराम मिळतो. तुळशीची पाने डोकेदुखीवरही गुणकारी आहेत

अॅसिडीटी, गॅस आणि अपचन यासारख्या समस्या तुळशीच्या पानांचा रस नियमित सेवन केल्यास बराच आराम मिळतो. यामुळे, शरीराची पीएच लेव्हल देखील संतुलित राहते

तुळस आपल्या शरीरास डिटोक्स करते आणि चयापचय चांगल्यारितीने प्रक्रिया वाढवते. तुळशीची पाने वजन कमी करण्यासही उपयुक्त ठरतात.

मुख दुर्गंधीचा त्रासही तुळशीच्या पानांनी नाहीसा होतो. जर तुम्ही दररोज सकाळी तुळशीची पाने रिकाम्या पोटी खाल्ली तर, ती तोंडातील बॅक्टेरिया काढून टाकतात आणि तोंडातून येणाऱ्या दुर्गंधीचा त्रास दूर करतात.