दुधी रायता खाण्याचे आरोग्यासाठी काही फायदे आहेत का?
27 मे 2025
Created By: राकेश ठाकुर
दुधीत फायबर, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, मॅग्नेशियम सारखी पोषक तत्त्वे आहेत.
उन्हाळ्यात दही आहारात समाविष्ट केलं पाहीजे. उष्ण असलं तरी शरीराला ताजेतवाने करते. तसेच पचनाच्या समस्या दूर करते.
दुधी रायता खायला खूप चविष्ट लागतो. दुधी आणि दह्याचे मिश्रण तुमच्या आरोग्यासाठी अनेक फायदे देते. चला जाणून घेऊयात
उन्हाळ्यात दुपारच्या जेवणात दुधी रायता समाविष्ट करा. यामुळे शरीर हायड्रेटेड राहते आणि थंडावा मिळतो. त्यामुळे उष्माघाताच्या समस्येपासून रक्षण होते.
या मिश्रणामुळे पचक्रिया सुधारते. दीर्घकाळ पोट भरलेलं राहतं. तसेच वजन कमी करण्यास मदत होते.
दह्यात अमिनो एसिड असते. तर दुधीत व्हिटॅमिन सी असते. त्यामुळे हा रायता खाल्ल्यास कोलेजन वाढतं आणि सुरकुत्या दूर होतात.
दुधी धुतल्यानंतर किसून घ्या. काही वेळ वाफवा. भांड्यात दही फेटून घ्या. त्यात काळे मीट, भाजलेले जिरे पावडर, काळी मिरी पावडर घाला. दुधी थंड करून त्यात मिक्स करा.
सकाळी रिकाम्या पोटी पुदीन उकळून पाणी प्यायल्याने काय होतं?