खराब डाएट व धावपळीच्या जीवनामुळे हृदयाचा वेग कमी होऊ लागतो. मात्र काही ज्यूसचे सेवन करून हृदय स्वस्थ ठेऊ शकता.

कोरफडीचा ज्यूस हृदयासाठी उत्तम असतो. त्यामधील अँटी-ऑक्सीडेंट्समुळे हृदयाच्या अनेक समस्या कमी होऊ शकतात.

डाळिंबामध्ये लोह, पोटॅशिअम, झिंक आणि ओमेगा -6 फॅटी ॲसिड मुबलक असते. हे सर्व हृदयासाठी फायदेशीर असते.

गाजर आणि बीटाच्या ज्यूसमधील नायट्रेट्समुळे ब्लड फ्लो चांगला होतो. ते हृदयासाठी लाभदायक असते.

पालकामध्ये लोह भरपूर असते, त्यामुळे ॲनिमियापासून रक्षण होतेच. हृदयाचे स्वास्थ्य जपण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.

आंबट फळांमध्ये असलेले अँटी-ऑक्सीडेंट्स इन्फ्लामेशन कमी करतात तसेच ब्लड क्लॉटही कमी करतात. त्यामुळे हृदयाच्या समस्याही कमी होतात.

हे सर्व ज्यूस सेवन करून तुम्ही तुमचे हृदय स्वस्थ ठेऊ शकता.