दिवसभरात वारंवार मलत्याग करण्याची इच्छा होणे हे आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे.
दिवसभरात अनेक वेळा शौचाला जावे लागणे हे घातक रोगांचे लक्षण असू शकते. ते कोणते, हे समजून घेऊया.
आतड्यांना सूज आल्याने किंवा एखाद्या इन्फेक्शनमुळे तुम्हाला वारंवार शौचाला जावे लागू शकते. दीर्घकाळापर्यंत आतड्यांना सूज आल्यास कॅन्सरचा धोका वाढतो.
आतड्यांना सूज आल्याने किंवा एखाद्या इन्फेक्शनमुळे तुम्हाला वारंवार शौचाला जावे लागू शकते. दीर्घकाळापर्यंत आतड्यांना सूज आल्यास कॅन्सरचा धोका वाढतो.
इरिटेबल बाऊल सिंड्रोममुळे मोठं आतडं प्रभावित होतं, त्यामुळे पोटदुखी, गॅस, बद्धकोष्ठता, सूज येणे व वारंवार शौचाला लागणे, असा त्रास होऊ शकतो.
सिलिएक रोग या पचनाशी संबंधित समस्येत छोट्या आतड्याला सूज येते व पोषक तत्व शोषली जात नाहीत. त्यामुळे पचन नीट होत नाही आणि ब्लोटिंग, पोटदुखी व दस्त सारखे आजार होतात.
पित्ताशयात इन्फेक्शन झाल्यामुळेही वारंवार शौचाला जावे लागू शकते. त्यामुळे थकवा आणि अशक्तपणाही जाणवतो.
अँटी-बायोटिक औषधांच्या अतीसेवनामुळेही पोट बिघडण्याचा त्रास होऊ शकतो.