22 जानेवारी 2025
दररोज किती ड्रायफ्रूट्स खायला हवेत? तज्ज्ञ सांगतात...
बदाम, काजू, आक्रोट, पिस्ता, मनुके आणि अन्य काही ड्रायफ्रूट्स लोकं रोज खाणं पसंत करतात.
ड्रायफ्रूट्समध्ये महत्त्वाचे पोषक घटक असतात. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि उत्साह वाढतो.
अनेक लोकं मिक्स ड्रायफ्रूट्स खाणं पसंत करतात. यात काजू, बदाम, मनुका आणि इतर सुका मेवा असतो.
आयुर्वेद एक्सपोर्ट किरण गुप्ताने सांगितलं की, आपल्या मुठीत येतील इतक्याच प्रमाणात ड्रायफ्रूट्स दिवसाला खाल्ले पाहीजेत.
मुठ्ठीत येतील इतके ड्रायफ्रूट्स रोज खाल्ले तर तुम्हाला आरोग्याला काहीच बाधा नाही. हे ड्रायफ्रूट्स भिजवून खाणं फायदेशीर ठरेल.
जर तुम्हाला कोणतीही शारीरिक बाधा असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्याने ड्रायफ्रूट्सच्या मात्रा खा.