कोलेस्ट्रॉल वाढलंय हे कसं समजतं? लक्षणं जाणून घ्या
9 डिसेंबर 2024
उलटसुलट खायची सवय आणि बदलेल्या जीवनशैलीमुळे शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते, ज्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात.
कोलेस्ट्रॉल वाढल्याने, हॉर्ट अटॅक, कोरोनरी आर्टरी डिजीज आणि हाय बीपीचा त्रास जाणवू शकतो
शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्याने अनेक लक्षणं दिसतात,जाणून घेऊयात
शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्याने छाती भरल्यासारखी/जड झाल्यासारखी वाटू शकते. नसांमध्ये बॅड कोलेस्ट्रॉल जमा झाल्यास हा असा त्रास होऊ शकतो
कोलेस्ट्रॉल वाढल्याने हार्टवर परिणाम होतो, ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो
डोळ्यांजवळ आणि त्वचेवरील पिवळे डाग हे कोलेस्ट्रॉल वाढल्याचं लक्षण असू शकतं, त्यामुळे दुर्लक्ष करु नका
कोलेस्ट्रॉल वाढल्याने शरीरात रक्ताभिसरण संथपणे होतं, ज्यामुळे हात-पाय सुन्न झाल्यासारखं वाटू शकतं किंवा थकल्यासारखं जाणवू शकतं
Disclaimer : वरील लक्षणांद्वारे स्वत:ला आजार आहे, असं मत बनवू नका, संशय असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या